Monday, December 9, 2024

लोकसभा निवडणुकीचे पडघम… धनश्रीताई विखेंची मतदारसंघात विविध कार्यक्रमांनी उपस्थिती

नगर : लोकसभा निवडणुकीला काही महिने उरले असताना नगर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. अहमदनगरमध्ये खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळयानिमित्त ठिकठिकाणी साखर वाटप करीत संपर्क अभियान सुरु केले आहे. आता खा.विखेंच्या जोडीने त्यांच्या सुविद्य पत्नी, रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे या सुध्दा मतदारसंघात विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. धनश्रीताई विखे यांचे एका कार्यक्रमा निमित्ताने श्रीगोंदा नगरीत जंगी स्वागत करण्यात आले. धनश्रीताईंची कार्यक्रमस्थळी येताना जंगी रोड शो झाला. त्यांच्यावर जेसीबीतून फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले. धनश्रीताई यांनी रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा या नात्याने ग्रामीण भाग पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील चांबुर्डी,सारोळा सोमवंशी,करेगव्हाण,निंबवी कोडे गव्हाण,आरंणगाव,ढवळगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ धनश्रीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles