Sunday, July 14, 2024

Ahmednagar news: विजेच्या शॉक लागून शेतकर्‍याचा मृत्यू ,दोन शेळ्याही दगावल्या

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावात पडलेल्या विजेच्या तारांचा शॉक लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर दोन शेळ्यादेखील दगावल्या आहेत. संभाजी किसन वाळके असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बेलवंडी गावातील वाळके वस्तीवरील शेतकरी संभाजी किसन वाळके हे शेळ्या घेऊन नदीच्या कडेला शेळ्यांना चरायला घेऊन गेले होते. नदीच्या कडेला असलेल्या शेतात दोन विद्युत पोल पावसामुळे कोसळले होते. विजेचे पोल पडून सुमारे 18 तास उलटले तरी देखील त्यातील विद्युत पुरवठा सुरूच होता.

शेळ्या चरत असताना विजेच्या तारांजवळ गेल्याने त्यांना विजेचा शॉक लागला. यावेळी संभाजी वाळके हे शेतकरी त्यांच्या जवळ त्यांनादेखील विजेचा शॉक लागला. घटनेची माहिती नातेवाईकांना समजताच त्यांनी तात्काळ जवळच्या विद्युत ट्रान्सफॉर्मरचा विद्युत पुरवठा खंडित केला. परंतु तोपर्यंत दोन शेळ्या आणि संभाजी वाळके यांचा मृत्यू झाला होता.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles