Sunday, December 8, 2024

बायकोवरचा राग, तरुणाने थेट मेहुण्याच्या बाळाला संपवलं; अहमदनगर हादरलं….

अहमदनगर-बायको नांदायला येत नाही म्हणून तरुणाला राग अनावर झाला. त्याने थेट सासुरवाडी गाठत मेहुण्याच्या ३ वर्षीय बाळाचं अपहरण केलं. इतक्यावरच न थांबता त्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. हत्येनंतर मृतदेह मक्याच्या शेतात नेऊन फेकला. तळपायाची आग मस्तकात जाईल अशी ही संतापजनक घटना श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली.
राहुल बोधक असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तर स्नेहदीप असं हत्या झालेल्या बाळाचं नाव आहे. आपणच स्नेहदीपची हत्या केली, अशी कबुली आरोपीने पोलिसांसमोर दिली आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेने श्रीरामपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा वैजापूर तालुक्यात रहिवासी आहे. सततच्या भांडणामुळे त्याची बायको श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे माहेरी निघून गेली होती. ती परत नांदायला येत नसल्याने आरोपीला राग अनावर झाला. आठ दिवसांपूर्वी आरोपीने आपलं सासर गाठलं.

तिथे मेव्हण्याशी (बायकोच्या भावाशी) वाद झाल्यानंतर त्याने ३ वर्षीय बाळाचं अपहरण केलं. यासंदर्भात ६ सप्टेंबर रोजी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी राहुल बोधक याच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी वैजापूर तालुक्यातून आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने चिमुकल्या मुलाची हत्या केल्याची कबुली दिली.

मात्र, मृतदेह नेमका कुठे फेकला याबाबत विचारणा केली असता आरोपी राहुल उडवाउडवीची उत्तरे देत होता. पोलिसांनी सर्व बाजूने तपास करत प्रकरणाचे धागेदोरे जुळवले आणि अखेर वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला ते संभाजीनगर रोडवरील गारच शिवारातील एका मक्याच्या शेतात चिमुकल्याचा मृतदेह शोधून काढला.

नराधम आरोपी राहुल बोधक याने स्नेहदिप याला तोंड दाबून मारल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हत्येचा अधिक उलगडा होणार आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेने श्रीरामपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles