Tuesday, June 25, 2024

नगर तालुक्यात खा. सुजय विखे कि निलेश लंकेना लीड, नेते म्हणतात….कार्यकर्त्यांच्या रंगल्या पैंजा

लोकसभेच्या निवडणुका होऊन दहा दिवस झाले तरी निवडणुकीच्या चर्चा काही थांबायला तयार नाहीत . नगर तालुक्यात कोण मताधिक्य घेतो याचीच सध्या गावोगावी चर्चा झडत आहे . तालुक्यात पुन्हा कमळ फुलणार की तुतारी वाजणार यावर कार्यकर्त्यांमध्ये जोरदार पैंजा रंगल्या आहेत .

नगर तालुका तीन विधानसभा मतदारसंघात विभागाला असला तरी राजकीयदृष्ट्या तालुक्याचे स्वतंत्र अस्तित्व आहे . नगर तालुक्यात यंदा उस्फुर्तपणे सरासरी ६६ टक्के मतदान झाले .मतदानाची वाढलेली टक्केवारी कोणाच्या पथ्याला पडणार याची गणिते सोडवण्यात सध्या गावोगावचे कार्यकर्ते मग्न आहेत .
महायुतीची धुरा जिल्हा बँकेंचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी सांभाळली .गावोगावी सभा, बैठका , प्रचारफेऱ्या या माध्यमातून त्यांनी थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला . महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना मताधिक्य मिळवण्यासाठी कर्डिले यांच्या समर्थकांनी प्रभावी प्रचारयत्रंणा उभी केली . भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग , तालुकाध्यक्ष दिपक कार्ले , ओबीसी सेलचे संतोष म्हस्के तसेच बाजार समितीचे आजी -माजी पदाधिकारी यांनी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला .
महाआघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या साठी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा . शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराचे नियोजन करण्यात आले .कॉग्रेसचे जेष्ठ नेते संपतराव म्हस्के , राष्ट्रवादीचे रोहिदास कर्डिले , उद्धव दुसुंगे , प्रताप शेळके , संदेश कार्ले , बाळासाहेब हराळ , प्रविण कोकाटे आदि आघाडीच्या नेत्यांनी प्रत्येक गावात बैठका, प्रचारफेरीचे नियोजन करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला .
मागील वेळी विखे यांना नगर तालुक्यात ५३ हजारांचे मताधिक्य मिळाले होते . मात्र त्यावेळी शिवसेना -भाजप यांची युती होती . कर्डिले , गाडे यांनी विखे यांच्या पाठिशी ताकद उभी केली होती . यावेळी मात्र दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढल्याने नगर तालुक्यातील दोन राजकीय ताकदी एकमेकांविरोधात उभ्या राहिल्या . यामुळे तालुक्याचे मैदान कोण जिंकणार, कुणाला किती मताधिक्य मिळणार याची चर्चा व याबाबत कार्यकर्त्यांच्या पैंजा झडत आहेत .

महाआघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या पारनेर विधानसभा मतदारसंघात नगर तालुक्यातील जवळपास ५० गावे येतात . त्यातच नगर तालुक्यातील अरणगाव हि लंके यांची सासुरवाडी व आजोळ आहे . यामुळे सासुरवाडी जावयाला किती साथ देते याची उत्सुकता सर्वांना लागली आहे .

हि देशाची निवडणूक होती .जनतेच्या मनात पंतप्रधान म्हणुन नरेंद्र मोदी यांचेच नाव आहे . यामुळे मतदारांनी स्थानीक प्रश्नांना जास्त महत्त्व न देता देशहिताचा विचार केला आहे . तालुक्यात महायुतीला किमान २५ हजार मतांची आघाडी राहिल . “—- दिलीप भालसिंग ( जिल्हाध्यक्ष , भाजप )

ग्रामीण भागातील जनता केंद्र सरकारच्या शेतीविरोधी धोरणाला कंटाळली आहे . शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी पाठ सोडायला तयार नाही . यामुळे केंद्र सरकारबाबत मतदारांमध्ये नाराजी दिसुन आली . यामुळे महाआघाडीला किमान ३० हजार मतांची आघाडी मिळेल . “—- संदेश कार्ले ( उपजिल्हाप्रमुख , ठाकरे सेना )

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles