एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारत देशामध्ये स्वच्छता अभियान राबवण्याचा संकल्प केला. त्यानुसार आज अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले परंतु हे स्वच्छता अभियान कुठेतरी फोटो पुरतेच आहे का असं पाहायला मिळालं. अभियान संपल्यानंतर सावेडी उपनगरातील प्रभाग क्रमांक दोन या ठिकाणी असलेल्या मनपा सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे, मा.नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक सुनील त्रिंबके, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार आदी नगरसेवकांनी या स्वच्छता अभियानाचा व अहमदनगर महानगरपालिकेचा जाहीर निषेध केला आहे. स्वच्छता अभियान संपल्यानंतर प्रभाग क्रमांक दोन या ठिकाणी मनपा सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे, मा.नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक सुनील त्रिंबके, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार आदींनी आपल्या प्रभागांमध्ये फिरून ज्या ज्या ठिकाणी कचरा साचलेला आहे त्याच्या जवळ उभे राहून सेल्फी विथ कचरा हे अभियान राबविले.महापालिकेच्या या स्वच्छता अभियानाची सावेडी उपनगरातील प्रभाग दोनच्या नगरसेवकांनी पोलखोल केली आहे. प्रभाग क्रमांक दोन मध्ये सर्वत्रच कचरा साचलेला असून या कचऱ्याचा ढिगार्यांवरती मोकाट कुत्रे तसेच मोकाट जनावरे हे तेथील घाण खाताना चे चित्र पाहायला मिळाले आहे..