Tuesday, April 23, 2024

दोन अवजड वाहनांच्या धडकेत एका वाहनचालकाचा मृत्यू,नगर तालुक्यातील खोसपुरी शिवारातील घटना

नगर – नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर खोसपुरी (ता. नगर) शिवारात झालेल्या अपघातात एका वाहनचालकाचा मृत्यू झाला आहे. ज्ञानदेव नामदेव सानप (वय ४१, रा. वडझरी ता. पाटोदा, जि. बीड) असे मयत तरूणाचे नाव आहे. सदरची घटना १७ फेब्रुवारी रोजी रात्री ११.५० वाजता घडली.

याप्रकरणी २२ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात वाहन चालक शहादेव वसंत बनवे (रा. कचरवाडी ता. जि. बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयताचे भाऊ आनंदराव नामदेव सानप (रा. पाटोदा, बीड) यांनी फिर्याद दिली आहे. ज्ञानदेव हे त्यांच्या ताब्यातील ट्रेलर घेऊन नगर-छत्रपती संभाजीनगर रस्त्याने जात असताना खोसपुरी शिवारात हॉटेल राजपुत लगत बनवे याने त्याच्या ताब्यातील वाहनाची अचानक लेन बदलून ब्रेक मारले. त्यामुळे ज्ञानदेव यांच्या ताब्यातील ट्रेलर ला पाठीमागून धडक बसून यात त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलीस अंमलदार थोरवे अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles