Monday, March 4, 2024

नगर तालुका खरेदी-विक्री संघ निवडणुक, महाविकास आघाडीवर केले गंभीर आरोप

नगर तालुक्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिले प्रत्युत्तर

मा. खा. कै.दादा पाटील शेळके यांच्या सहानुभूतीचा वापर करून महाविकास आघाडीने फुकटचे श्रेय घेऊ नये – रावसाहेब पाटील शेळके

नगर : नगर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले असून मा. खा. कै.दादा पाटील शेळके  यांच्या नावाचा व सहानुभूतीचा वापर करून महाविकास आघाडीच्या स्वयंघोषित नेत्यांनी फुकटचे श्रेय घेऊ नये, तुम्ही सर्वजण जिल्ह्याचे नेते म्हणता परंतु तुम्हाला खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीच्या मतदार यादीत नावे असून देखील पॅनल तयार करता आला नाही, तुमच्या कुटील कटकारस्थानाला वैतागून मी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा महिन्यापूर्वीच भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. पूर्वी कै. दादा पाटील शेळके व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे राजकारणात विरोधी भूमिका होती तरीदेखील नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला कै.मा. खा. दादा पाटील शेळके यांचे नाव देण्याचे काम केले आहे त्यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी मनाचा मोठेपणा दाखवला,  तुम्ही तर त्या कार्यक्रमाला देखील उपस्थित राहिले नाही मात्र तुमच्या स्वतःच्या राजकारणासाठी कै.मा. खा. दादा पाटील शेळके यांचे नाव वापरून राजकारण करता.  यापुढील काळात माझ्या वडिलांचे म्हणजे कै.मा. खा. दादा पाटील शेळके यांचे नाव घेऊन भावनिक राजकारण करू नये असे प्रत्युत्तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रावसाहेब पाटील शेळके यांनी दिले. 
 नगर तालुक्यातील महाविकास आघाडीच्या स्वयंघोषित नेत्यांना कै.मा.खा. दादा पाटील शेळके यांच्या कुटुंबाबद्दल सहानुभूती होती तर त्यांच्या मतदारसंघ वगळून तालुक्यातील इतर जागेवर उमेदवार उभे करायचे होते एकीकडे जिल्ह्याचे नेते म्हणायचे आणि निवडणुकीमध्ये पॅनल सुद्धा तयार करायला उमेदवार मिळत नाही, भावनिकतेचे राजकारण आता संपले असून जनतेच्या प्रश्नावर सुरू झाले आहे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली नगर तालुक्याचा विकास झाला आहे, महाविकास आघाडीच्या नेत्यांना बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने पराभव स्वीकारावा लागला आहे अशी प्रतिक्रिया बाजार समितीचे चेअरमन भाऊसाहेब बोठे यांनी दिली

 नगर तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक पार पडली असून जिल्ह्याचे नेते मा, मंत्री शिवाजी कर्डीले यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली नगर तालुक्यातील जनतेने विश्वास दाखवत खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीचा खर्च वाचवण्याचे काम केले आहे, आणि सभासदांना योग्य न्याय मिळावा यासाठी निवडणूक बिनविरोध केली, मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चुकीचा अर्थ काढत सांगितले की, कै.मा. खा. दादा पाटील शेळके यांना श्रद्धांजली म्हणून सोडतो ही राजकारणासाठी भावनिक प्रतिक्रिया असून ती चुकीची आहे, जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांना सभासदांनी मोठ्या मताने निवडून दिले, याचबरोबर नगर तालुका बाजार समिती निवडणुकीत देखील महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार पाडले, राजकारणासाठी चुकीचा संदेश देणे योग्य नसून खरेदी विक्री संघाचे नवनिर्वाचित सर्व सदस्य व माजी मंत्री शिवाजी कर्डीले हे चेअरमन पदासाठी योग्य निर्णय घेतील तुम्ही सांगण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया बाजार समिती उपसभापती रभाजी सूळ यांनी दिली

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles