Tuesday, April 23, 2024

होळीच्या दिवशीच नगर हादरलं, अनैतिक संबंधाच्या संशयातून आईसह दोन मुलींना जाळून…

नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे दोन मुलींसह आईचा मृत झाला आहे.अनैतिक संबंधाच्या संशयातून ही घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी सुनील लांडगे यास आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यातून त्यांचे नेहमीच वाद होत असत. आज सकाळी (२५ मार्च) आरोपी व पत्नीत पुन्हा वाद झाला. त्याने पत्नीसह मुलींच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. यात तिघींचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे.

लीलाबाई सुनील लांडगे (आई), साक्षी व ख़ुशी (मुली) अशी मृतांची नावे असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती समजताच नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव भेटली. त्याठिकाणी पंचनामा करत कार्यवाही सुरु केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून तिघींच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली होती. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles