नगर शहरातील उपनगरात एका शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीस तरुणाने हात धरून माझ्यासोबत लग्न न केल्यास बंदुकीने गोळ्या घालून तुला व तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. 25 जुलै रोजी दुपारी चार वाजता शाळेत ही घटना घडली. सचिन गोरक्षनाथ ससे (रा. जेऊर बायजाबाई, ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 25 जुलै रोजी दुपारी चार वाजता मी वर्गात असताना सचिन ससे हा वर्गात आला. हात पकडून मला तुझ्यासोबत बोलायचे आहे. तू माझ्याबरोबर बाहेर चल असे म्हणून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तू माझ्यासोबत लग्न केले नाही तर तुझ्या लग्नात येऊन बंदुकीने गोळ्या घालून तुला व तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मुजावर करत आहेत.