नगर तालुक्यातील एका गावामध्ये रात्रीच्या वेळी घरासमोर उभ्या असलेल्या मुलीला बाजूला ओढत तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलीच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, 18 ऑगस्ट रोजी बेकरीमधून काम उरकून रात्री घरी आलो असता मुलगी बोअरची मोटर चालू करून दारात उभी होती. थोड्या वेळाने टाकी भरल्याने ती मोटार बंद करण्यासाठी गेली.
पण मोटार का बंद झाली नाही हे पाहण्यासाठी बाहेर आलो असता मुलगी घरासमोर दिसली नाही. त्यावेळी घराच्या बाजूला तिचा ओरडण्याचा आवाज आला. तिला आवाज दिला असता तिचा हात ओढणारा पळून गेला. मुलीच्या सांगण्यानुसार संबंधिताकडे जाब विचारण्यास गेलो असता त्याचे कुटुंबियांनी घरासमोर येऊन शिवीगाळ व मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात हसन शेख व त्याची पत्नी, दोन मुलांसह सहा जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 189 (2), 191 (2), 118 (1), 115, 125, 352, 74, 75, बालकांचे लैंगिक अपराध संरक्षण अधिनियम 2012 च्या कलम 8 व मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या 37 (1) व 37 (3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.