गुंडेगाव येथे शुढळेश्वर पतसंस्थेंच्या सचिव, संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची ठेवीदार यांची मागणी; सचिव,संचालकासह यांच्या नातेवाईकांकडे लाखो रुपये कर्ज असताना कोणतीच कारवाई होत नाही.*
*ठेवीदार खातेदार जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर देणार धरणे..*
आजपर्यंत आपण एजंट दादागिरीच्या अनेक घटना पाहिल्या आहेत.परंतु कुंपणच शेत खातय अशीच घटना गुंडेगाव येथील शुढळेश्वर ग्रामीण पतसंस्थेंच्या माध्यमातून झाली आहे. शुढळेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था येथील ठेवीदार यांच्या ठेवी मिळण्याबाबत सचिव,संचालक यांच्यावर गुन्हे दाखल करून तसेच त्यांचे प्रॉपटी जप्त करून व सामन्य ठेवीदारांच्या ठेवी परत कराव्यात अन्यथा जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असे गुंडेगाव,राळेगण म्हसोबा येथील ठेवीदारांनी जिल्ह्याधिकारी यांना निवेदन दिले आहे.याबाबत निबंधक कार्यालय येथे वेळोवेळी तक्रार करुनही कोणत्याही प्रकारची कारवाई पतसंस्थेंच्या संचालक सचिव यांच्यावर न करता यांनी घेतलेल्या लाखो रुपये कर्जाला हे सहनिबंधक कार्यालय अधिकारी पाठीशी घालून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ठेवीदारांना वेठीस धरत आहे.सदरील पतसंस्थेच्या सामान्य शेतकन्यांच्या गेल्या दोन वर्षापासून ठेवी परत देण्यास टाळाटाळ करित असल्याने आम्ही ठेवीदार दि. ०२/१०/२०२३ पासून जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहोत. तरी सदरील परिस्थितीनंतर होणाऱ्या घटनेस व परिणामास सचिव, संचालक मंडळ,सहनिबंधक कार्यालय सर्वस्वी जबाबदार असणार आहे. असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी प्रविण पिंपळे (प्रहार तालुका अध्यक्ष )अंबादास हराळ,संतोष हराळ, अंबादास जगधणे,अशोक माळशिकारे, हर्षल थोरे, प्रसाद मदणे,सिंधुबाई त्रिंबक हराळ,मोनिका गुंजाळ,गोदाबाई पोपट शेळके,पोपट शेळके, मच्छिंद्र गाढे आदी उपस्थित होते..
शुढळेश्वर पतसंस्थेच्या चेअरमन, सचिव आणि संचालक यांनी जर सर्वसामान्य गोरगरीब मायबाप जनतेचे कष्टाचे पैसे दिले नाहीत. तर दोन ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सर्व ठेवीदारांना घेऊन आमरण उपोषण करणार आहे.
*अशोक माळशिकारे* (उपजिल्हाध्यक्ष प्रहार युवाशक्ती)