Monday, April 22, 2024

शेत जमीन नांगरण्यासाठी आलेल्या मायलेकीला मारहाण करत गैरवर्तन,नगर तालुक्यातील १३ जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर -सरकारकडून मिळालेली शेत जमीन नांगरण्यासाठी आलेल्या कोपरगाव तालुक्यातील माय-लेकीला मारहाण करून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याची घटना मंगळवारी (दि. २७) दुपारी पिंपळगाव माळवी (ता. नगर) शिवारात घडली. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून १३ जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशा लहु पवार, लहु वसंत पवार, ताई पवार, विकास गोलवड, मल्हारी माळी, रवी माळी, बबन माळी, गणेश दांगट, कोमल गोलवड, हिराबाई गोलवड, रंजना माळी, शुभांगी गोलवड, पढ्या माळी (सर्व रा. व्यवहारे वस्ती, पिंंपळगाव माळवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी या कोपरगाव तालुक्यातील एका गावात राहतात. त्यांना पिंपळगाव माळवी शिवारात सरकारकडून शेती मिळाली आहे.

मंगळवारी फिर्यादी व त्यांची आई ते शेत नांगरण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेल्या होत्या. तेथे त्यांना आशा पवार व इतरांनी विरोध केला. फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यांच्या सोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यांच्या आईला शिवीगाळ करून मारहाण केली. तुम्ही जर परत शेतात आले तर तुम्हाला पाहुन घेऊन अशी धमकी दिली. फिर्यादी व त्यांच्या आईच्या गळ्यातील पोत तोडून नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अंमलदार मिसाळ तपास करीत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles