अहमदनगर : महिलेचा पाठलाग करून घरात घुसून पळवून नेऊन महिलेवर वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना
मंगळवारी (दि. ५) समोर आली आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रसाद बहिरू दारकुंडे व बहिरू लक्ष्मण दारकुंडे (दोघे रा. बहिरवाडी, ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील
आरोपी प्रसाद याने महिलेचा पाठलाग केला व मोबाईल ताब्यात घेतला. त्यानंतर त्याने महिलेला दुचाकीवरून पळवून नेले. त्याने महिलेवर वेळोवेळी अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास उपअधीक्षक अमोल भारती करत आहेत.
महिलेचा पाठलाग करून घरात घुसून पळवून नेऊन अत्याचार,नगर तालुक्यातील दोघांविरुद्ध गून्हा दाखल
- Advertisement -