नगर : खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व गावात जनतेला मोफत साखर वाटप कार्यक्रम सुरु आहे. नगर तालुक्यातील वाळुंज येथे त्यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी केला.
गायकवाड भाषणात म्हणाले, वाळुंज गावात मी स्वतः राहतो व आमची छोटीशी शेती इथे आहे. महायुतीतील घटक पक्ष म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाळूंज फाटा ते वाळूंज गाव रस्त्याचे काम प्रलंबित आहे. या रस्त्यासाठी खासदार निधीतून निधी मंजूर करावा अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने गायकवाड यांनी केली. महायुती असली तरी कार्यक्रमाचा निरोप नव्हता. ऐनवेळी कळल्यावर ग्रामस्थ म्हणून उपस्थित राहिलो अशी खंतही गायकवाड यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, प्रताप पाचपुते, बाजार समिती सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, माजी सभापती अभिलाष पाटील घिगे, तालुका विकास अधिकारी, विद्यमान सरपंच, उपसरपंच, चेअरमन ,व्हा. चेअरमन व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाळुंज विद्यालयाचे प्राचार्य रोहाकले यांनी केले.
https://www.facebook.com/prashantgaikwad55/posts
वाळूंज येथे खा.विखेंचा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गायकवाड यांनी केला जाहीर सत्कार
- Advertisement -