अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या वतीने रोजगार हमी व फलसंवर्धन विकास मंत्री संदिपान भुमरे यांचे शहरात जंगी स्वागत करण्यात आले. मराठा आरक्षणासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे भुमरे यांचा जिल्ह्याच्या वतीने पुष्पहार टाकून सत्कार करण्यात आला.
सक्कर चौक येथे फटाक्यांच्या आतषबाजीत झालेल्या स्वागत सोहळ्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संपर्कप्रमुख सचिन जाधव, शहरप्रमुख दिलीप सातपुते, उपजिल्हाप्रमुख आनंदराव शेळके, युवासेना शहरप्रमुख पै. महेश लोंढे, नगरसेवक भैय्या परदेशी, तालुकाप्रमुख अजित दळवी, युवा सेना तालुका प्रमुख सचिन ठोंबरे, दिगंबर गेंट्याल, परेश खराडे, उपतालुकाप्रमुख अंबादास कल्हापुरे, तालुकाप्रमुख सोमनाथ शिंदे डॉ. करण गाडे, प्रल्हाद जोशी, आनंद भागानगरे, आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरात आलेले मंत्री संदिपान भुमरे यांनी नगर तालुक्यासाठी विविध विकास कामांकरिता 1 कोटी 20 लाख रुपये निधी जाहीर केला. काही क्षणात मंत्री यांनी निधी जाहीर करुन कागदपत्रांवर स्वाक्षरी करताच उपस्थित कार्यकर्ते भारावले.
नगर तालुकाध्यक्ष अजित दळवी की, मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संदिपान भुमरे यांनी महत्त्वाचे काम केले. एक शिवसैनिक म्हणून काम करताना उपेक्षितांना न्याय देण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न सुरु आहे. तर ग्रामीण भागातील विकास कामासाठी त्यांनी एका क्षणात निधी उपलब्ध करुन शिवसेनेची कार्यपध्दती दाखवून दिल्याचे, विकासात्मक भूमिका घेऊन शिवसेना वाटचाल करत आहे. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन राज्यकारभार चालवला जात आहे. मराठा आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शहराच्या विकास कामासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मिळाला. त्यातून विविध विकासकामे मार्गी लावण्यात आली. तर भुमरे यांनी नगर तालुक्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री संदीपान भुमरे नगर तालुक्यातील आले अणं जवळपास दिड कोटीचा निधी, कार्यकर्ते भारावले…
- Advertisement -