नगर तालुक्यातील गुंडेगाव हा मा.जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो परंतु मागील ग्रामपंचायत निवडणुकीत बरोबरीने उमेदवार निवडून आले व एक अपक्ष उमेदवार निवडून आल्यामुळे सत्ता कर्डिले गटाला गेली.यातच उपसरपंच संतोष भापकर यांनी आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.
या पदाची निवडणुक १९ जानेवारी २०२४ रोजी पार पडली असता ग्रामपंचायत उपसरपंच पदी कुशुम हराळ यांची बिनविरोध निवड झाली आहे.सदर उपसरपंच पदासाठी तीन अर्ज दाखल करण्यात आले होते यापैकी ग्रामपंचायत सदस्य कुशुम हराळ यांनी दोन फॉर्म दाखल केले होते तर ग्रामपंचायत सदस्य संतोष धावडे यांनी अर्ज दाखल केला होता. ऐनवेळी संतोष धावडे यांनी आपला फॉर्म मागे घेतला यामुळे कुशुम हराळ यांचा एक फॉर्म अवैध ठरवण्यात आला तर दुसरा वैद्य ठरवण्यात आला आहे या निवडीच्या अध्यक्ष पदी संरपच सौ.मंगलाताई सकट या होत्या तसेच निवडणुक निरीक्षक म्हणून तुपे विस्तार अधिकारी पंचायत समिती नगर व सचिव ग्रामसेवक अशोक जगदाळे यांनी काम पाहिले आहे.
यावेळी कुसुम हराळ यांची बिनवरोध निवड करण्यात असे अध्यक्ष सरपंच सौ.मंगल सकट यांनी उपसरंपच पदाची घोषणा केली.ही ग्रामपंचायत निवडणुकीत बाळासाहेब हराळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुरेखा चौधरी , छायाताई माने , जयश्री कुताळ , संदीप जाधव , संजय कोतकर , सुनिल भापकर , ग्रामस्थ रामदास हराळ , एकनाथ कासार , अनिल पवार , शिवनाथ कोतकर , चंद्रकांत निकम , सुभाष कोतकर , धन्यकुमार हराळ , अशोक कोतकर , संदीप भापकर , भाऊसाहेब कोतकर , अंबादास कासार , सचिन कुताळ , गोपाल बैरागी , अशोक पवार , रामदास भापकर , भाऊसाहेब शिंदे , राहुल कोतकर , अनिल हराळ आदी उपस्थित होते.शेवटी प्रोसेडिंग मीटिंग वेळी भाजपचे ग्रामपंचायत सदस्य अनुपस्थित राहिले.बाळासाहेब हराळ यांच्या नेतृत्वाखाली गावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू.भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी गावात विकास न केल्याने हा निर्णय घेतल्याचे उपसरपंच कुसुम हराळ यांनी सांगितले
नगर तालुक्यातील गुंडेगावच्या उपसरपंचपदी हराळ यांची निवड
- Advertisement -