नगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिनांक 26 ऑक्टोबर रोजी विविध कामांसाठी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या नियोजन निमित्त माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला आहे. यावेळी बोलताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने विकासाची भरारी घेतली आहे. त्यांच्या माध्यमातून निळवंडे धरणाचे काम मार्गी लागले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कालव्यातून पाणी सोडण्याचा लोकार्पण सोहळा तसेच शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन होणार आहे, याचबरोबर शिर्डी येथील श्री साईबाबा दर्शनरांगेचे उद्घाटन संपन्न होणार आहे, तरी या सोहळ्यासाठी नगर तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी लागणाऱ्या योजना राबविण्यात आल्या आहे. पंतप्रधान मोदी हे 26 ऑक्टोंबर रोजी दुपारी अडीच वाजता सभेला संबोधित करणार आहे तरी कार्यकर्त्याना घेऊन जाण्यासाठी प्रत्येक गावामध्ये आदल्या दिवशीच रात्री बस येणार आहे.
नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नगर जिल्हा दौऱ्याच्या निमित्त पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला यावेळी खासदार सुजय विखे पाटील बोलत होते, यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डीले, बाजार समिती सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, अंकुश शेळके, तालुकाध्यक्ष दीपक कार्ले, आनंदराव शेळके, दत्ता तापकिरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले की पंतप्रधान मोदी यांनी सर्वसामान्यांपर्यंत विविध योजना घेऊन जाण्याचे काम केले आहे ते आता आपल्या नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला नगर तालुक्यातून १ लाख नागरिक जाणार आहे असे ते म्हणाले.
नगर तालुक्याला लवकरच स्वतंत्र तहसीलदार, दोन नायब तहसीलदार, पुरवठा अधिकारी नेमण्यात आल्याचा जीआर काढला आहे, त्यामुळे नगर तालुक्यातील जनतेचे प्रश्न तातडीने मार्गी लागणार आहे, आम्ही एक वर्षात बरीच कामे मार्गी लावली, जर ३ वर्ष मिळाले असते तर आणखी विकास कामे मार्गी लागली असती असे खासदार सुजय विखे पाटील म्हणाले