नगर ता. पिंपळगांव कौंडा, येथील शेतवस्तीवरील घरात घुसून चाकुचा धाक दाखवुन जबरी चोरी करणारे 3 सराईत आरोपी 60000/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद,
स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी श्री. बाळासाहेब रंगनाथ केदारे वय 45, रा. पिंपळगांव कौंडा, ता. नगर हे दिनांक 12/01/24 रोजी त्यांचे राहते घरात असताना मध्यरात्रीचे वेळी 4 अनोळखी चोरट्यांनी घरात प्रवेश करुन फिर्यादीस मारहाण करुन कपाटातील 1,00,000/- रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेले बाबत नगर तालुका पो.स्टे.गु.र.नं. 14/2024 भादविक 394, 34 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी दिनांक 19/01/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/सोपान गोरे, सफौ/भाऊसाहेब काळे, पोहेकॉ/मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, अतुल लोटके, ज्ञानेश्वर शिंदे, देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, विजय ठोंबरे, पोकॉ/अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, रणजित जाधव, रविंद्र घुंगासे, रोहित मिसाळ, मेघराज कोल्हे, चासफौ/उमाकांत गावडे व चापोहेकॉ/ संभाजी कोतकर अशांचे पथक नेमुन वर नमुद गुन्ह्याचा तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. पथक रेकॉर्डवरील गुन्हेगार व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करत असताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वर नमुद गुन्हा हा आरोपी नामे कबीर काळे रा, सुरेगांव, ता. श्रीगोंदा याने त्याचे इतर साथीदारासह केला असुन तो ब्रम्हगिरी, त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक परिसरात वास्तव्यास आहे, आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देवुन त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे जावुन खात्री करुन मिळुन आल्यास कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. पथकानेत्र्यंबकेश्वर, नाशिक येथे जावुन संशयीत आरोपीचे वास्तव्याबाबत माहिती घेत असताना संशयीत आरोपी नामे कबीर काळे हा त्याचे इतर साथीदारासह ब्रम्हगिरी पर्वतावरील एका आश्रमात वास्तव्यास असले बाबत माहिती वरुन पथकाने वेशांतर करुन ब्रम्हगिरी पर्वतावरील आश्रमात तिन दिवस मुक्कामी राहुन आरोपींना मिळुन आल्याने शिताफीने ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) कबिर उंब-या काळे वय 22, 2) सार्थक ऊर्फ सिव्हील ऊर्फ लंगड्या सगड्या काळे वय 21, दोन्ही रा. सुरेगांव, ता. श्रीगोंदा, 3) साईनाथ तुकाराम जाधव वय 33, रा. घोसपुरी, ता. श्रीगोंदा असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता आरोपींनी त्यांचे साथीदार नामे 4) मिथुन उंब-या काळे, रा. सुरेगांव, ता. श्रीगोंदा (फरार) 5) बबुशा चिंगळ्या काळे रा. वांगदरी, ता. श्रीगोंदा (फरार) यांचे सोबत केला असुन गुन्ह्यातील चोरी केलेले सोने व रोख रक्कम सुरेगांव, ता. श्रीगोंदा येथील राहते घरासमोर लपवुन ठेवल्याचे सांगितले. पथकाने लागलीच पंचासह नमुद ठिकाणी जावुन खात्री करता 50,000/- रुपये किंमतीचे दागिने व 10,000/- रुपये रोख असा एकुण 60,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने ताब्यातील तिन्ही आरोपींना नगर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 14/2024 भादविक 394, 34 या गुन्ह्याचे तपासकामी नगर तालुका पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.
Om japkar