Tuesday, December 5, 2023

नगर जिल्ह्यात जरांगे पाटलांविरोधात सरपंचांची आक्षेपार्ह पोस्ट, बॅनरला फासले काळे

गावात तणाव, गाव बंद, माफी नाही तो पर्यंत ग्रामपंचायत मध्ये प्रवेश नाही , जरांगे पाटलांविरोधात शेंडी सरपंचांची आक्षेपार्ह पोस्ट

नगर तालुका – शेंडी ता.नगर येथील सरपंच यांनी गावातील व्हाट्स अप ग्रुप वर जरांगे पाटील यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली.त्याचे तीव्र पडसाद आज दिवसभर गावात दिसून आले. संतप्त गावकऱ्यांनी गाव बंद केले.गावात निषेध सभा आणि हजारो तरुणांची मोठी रॅली काढण्यात आली. जोपर्यंत सरपंच माफी मागत नाहीत तोपर्यंत सरपंचांना ग्रामपंचायत मध्ये पाऊल ठेवून देणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.

शेंडी ता. नगर येथील महिला सरपंच प्रयागा लोंढे यांनी
18 नोव्हेंबर रोजी गावातील शेंडी पोखर्डी वार्ता या व्हाट्स अप ग्रुप वर मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली.त्यामुळे गावातील वातावरण तंग झाले.आज सकाळी गावातील दत्त मंदिर परिसरात गाव आणि परिसरातील हजारो नागरिक एकत्र येत निषेध सभा घेण्यात आली.त्यांनतर उपस्थित संतप्त ग्रामस्थांनी गावात मोठी रॅली काढत शक्ती प्रदर्शन केले.संतप्त तरुणांनी सरपंच प्रायगा लोंढे यांच्या फोटो असलेल्या गावातील बॅनर ला काळे फासले.तसेच जोपर्यंत सरपंच लोंढे माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना ग्रामपंचायत मध्ये प्रवेश करू दिला जाणार नाही असा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला. आज दिवसभर शेंडी गाव पूर्णपणे बंद होते व गावात तणावाचे वातावरण होते.यावेळी
शेंडीचे माजी सरपंच सीताराम दाणी,कापुरवाडी सरपंच सचिन दुसुंगेवारूळ वाडीचे सरपंच सागर कर्डीले,पोखर्डी चे सरपंच अंतू वारुळे,माजी सरपंच रामेश्वर निमसे,अजय महाराज बारस्कर
यांसह हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.सरपंच प्रयागा लोंढे यांच्या विरोधात सीताराम दाणी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सामाजिक भावना दुखवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: