Saturday, December 7, 2024

सीना धरणाच्या आवर्तनाचा मुद्दा, आ.राम शिंदे आक्रमक होताच कार्यकारी अभियंता निलंबित…

कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरणातून आवर्तन सोडावे यासाठी आक्रमक झालेल्या आमदार प्रा.राम शिंदे यांच्या मागणीला आज (12 रोजी) मोठे यश आले आहे. जिल्हास्तरीय टंचाई आढावा बैठकीत शिंदे यांनी सीना धरणाच्या आवर्तनाचा मुद्दा गाजवला. आमदार शिंदे यांच्या मागणीनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तात्काळ सीना धरणातून आवर्तन सोडण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर कार्यकारी अभियंत्यावर कारवाई करण्याचा मोठा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.नगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आमदार प्रा. शिंदे आक्रमक झाल्याचे दिसून आले. सीना धरणात पाणी शिल्लक असतानाही कार्यकारी अभियंता देशमुख यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरले. जनतेसह शासनाची दिशाभूल केली. शेतकऱ्यांचे नुकसान केले. शासनाच्या विरोधात चिड निर्माण होईल असे कृत्य केल्याचा मुद्दा शिंदे यांनी उपस्थित करत देशमुख यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
टंचाई आढावा बैठकीत सीना धरणातून आजच्या आज आवर्तन सोडण्याचे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले. त्याचबरोबर कार्यकारी अभियंता देशमुख यांच्यावर शिस्तभंगासह निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.https://x.com/RamShindeMLA/status/1756941260181676136?s=20

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles