Wednesday, May 14, 2025

Ahmednagar news: ट्रॅक्टर उलटल्याने त्या खाली दबून युवकाचा मृत्यू

अहमदनगर – ट्रॅक्टर चालवत असताना तो अचानक उलटल्याने त्या खाली दबून ट्रॅक्टर चालविणाऱ्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील नांदगाव शिंगवे येथ सोमवारी (दि.२७) दुपारी घडली. उदीत उत्तम सगळगिळे (वय २०, रा. नांदगाव शिंगवे, ता.नगर) असे मयत युवकाचे नाव आहे.

मयत उदीत हा सोमवारी दुपारी ट्रॅक्टर घेवून शेतात चाललेला असताना ट्रॅक्टर अचानक उलटला गेला, त्यात उदीत हा ट्रॅक्टर खाली दबला गेला. तो गंभीर रित्या जखमी झाला. त्याला उपचारासाठी ऋतुराज सूर्यभान जाधव व इतरांनी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दुपारी ३.२५ च्या सुमारास दाखल केले. मात्र तेथील मेडिकल ऑफिसर डॉ. वने यांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles