व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्हाला एक स्टॉल दिसत आहे. या स्टॉलच्या बाजूला काही व्यक्ती आहेत जे दूध पिण्यासाठी थांबलेले आहेत. शिवाय या काकांकडे काही खाद्यपदार्थही आहेत, जे घेण्यासाठी लोक थांबलेले आहेत. व्हिडीओत तुम्ही पाहिले तर स्टॉलकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काकांनी जबरदस्त जुगाड कलेला आहे, जो तुम्हाला व्हायरल व्हिडीओत दिसेल. तुम्ही आतापर्यंत या गाड्यांवर वेगवेगळी नावं पाहिली असतील; जसं की, अमृततुल्य, येवले चहा, प्रेमाचा चहा. मात्र, या काकांनी आपल्या गाड्याला ‘आप्पाचा विषय लय हार्ड आहे’ म्हणत अख्खं गाणंच गाड्यावर लावलं आहे.
हा व्हिडीओ ahmednagar_trends नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये “नगरकरांचा नादच खुळा, असा जबरदस्त ट्रेंड दुसरीकडं कुठंच दिसणार नाही”, असं लिहिलं आहे.https://www.instagram.com/ahmednagar_trends?igsh=MTk2dWdmODJxZXloeQ==