Saturday, March 2, 2024

नगर अर्बन बँक घोटाळा…दोन माजी संचालक पोलिसांच्या ताब्यात

नगर 26 Jan. : नगर अर्बन सहकारी बँक (बहुराज्यीय) कर्ज गैरव्यवहार व घोटाळ्याप्रकरणी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बँकेच्या दोन माजी संचालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. अनिल कोठारी व मनेष साठे अशी दोघांची नावे आहेत. .

नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणाची व्याप्ती व आरोपींची संख्या मोठी असल्याच्या शक्यतेने पोलिसांनी तपासासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली ह्यएसआयटीह्णची स्थापना केली आहे. त्यानंतर आता कारवाईला गती आली असून, या गुन्ह्यात प्रथमच दोन संचालकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मनेष साठे हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत.

बँकेची माजी संचालक तथा बँक बचाव समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अर्बन बँकेतील २८ संशयित कर्ज प्रकरणांत फसवणूक व १५० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप असणारा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल आहे. आर्थिक गुन्हे शाखेमार्फत त्याचा तपास सुरू आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी बँकेचे सर्व कर्जप्रकरणांचे ‘फॉरेन्सिक ऑडिट’ करून घेतले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles