Saturday, January 18, 2025

प्रतिभाताई शरद पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री….नगरमध्ये झळकले बॅनर…

नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी व महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री देण्याची मागणी राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या प्रदेश सचिव (संघटक) विद्या गाडेकर यांनी केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास प्रथम महिला मुख्यमंत्री पदाचा मान शरद पवार यांच्या पत्नी सौ. प्रतिभा पवार यांना देण्याचा त्यांनी आग्रह धरला आहे. तर या मागणीचे थेट फलक शेवगाव-पाथर्डी मतदार संघात लावण्यात आले आहे.
महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचार रोखण्यासाठी नुकतेच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा मोर्चा काढून सर्वांचे लक्ष वेधले होते. महिलांच्या संरक्षणासाठी व सक्षमीकरणासाठी एका महिला मुख्यमंत्रीची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. प्रतिभा पवार यांना महिला मुख्यमंत्री करण्याची नव्याने मागणी समोर आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. या मागणीने देखील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे जाणकारांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

1 COMMENT

Comments are closed.

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles