Monday, March 4, 2024

धनश्रीताई विखे रममाण झाल्या कर्डिले परिवाराच्या हळदीकुंकु कार्यक्रमात, फुगडीचा आनंद Photos

कर्डिले परिवाराच्या हळदीकुंकु कार्यक्रमात धनश्रीताई विखेंचा सहभाग, फुगडीचा आनंद
नगर : खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनश्रीताई विखे पाटील सध्या नगर दक्षिणेत जनसंपर्क वाढवत आहेत. विखे परिवार आणि कर्डिले परिवार मागील काळात चांगलाच निकट आला आहे. धनश्रीताई विखे यांनी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी आयोजित हळदीकुंकु कार्यक्रमास उपस्थित राहून महिलांशी संवाद साधला. यावेळी विखेंनी कर्डिले कुटुंबाशी हितगुज साधत फुगडीचाही आनंद लुटला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी कर्डिले परिवारातर्फे सौ. अलकाताई शिवाजीराव कर्डिले व सौ. प्रियंकाताई अक्षय कर्डिले यांनी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले होते. या समारंभास उपस्थित राहून सर्व महिला भगिणींशी संवाद साधत विचारांची देवाणघेवाण केली.
यावेळी जिल्ह्यातील महिला भगिनी या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दरवर्षी कर्डिले परिवारातर्फे हा भव्य हळदी कुंकू समारंभ आयोजित केला जातो. या माध्यमातून महिला भगिनी एकत्र येऊन सामाजिक एकोपा वृद्धिंगत करत असतात. शिवाय आपल्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन देखील अशा कार्यक्रमांमधून होते. त्याअर्थी हळदी कुंकू समारंभ आयोजित होणे महत्वाचे असल्याने कर्डिले परिवाराच्या वतीने हा समारंभ अतिशय उत्साहात साजरा केला जातो, असे विखे यांनी म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles