Monday, December 9, 2024

विखेंच्या रॅलीत शिवाजीराव कर्डिले, संदीप कोतकर यांचे फोटो असलेले फलक ठरले लक्षवेधी

नगर : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेल्या रॅलीत हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. आ.संग्राम जगताप हे स्वत: या रॅलीत सहभागी झाले होते. त्याचवेळी या रॅलीत कार्यकर्त्यांनी झळकावलेले फोटोंचे फलक लक्ष वेधणारे ठरले. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा बॉस असा उल्लेख असलेला फलक चर्चेचा विषय ठरला. त्याचवेळी माजी महापौर संदीप कोतकर यांचे फोटो असलेले फलकही रॅलीत होते. नगर शहरातील राजकारणावर कर्डिले-कोतकर-जगताप यांची अनेक वर्षांपासून मोठी पकड आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्त तिघांचीही एकत्रित ताकद विखेंच्या पाठिशी उभी राहिल्याचे आज पहायला मिळाले. तिघांचेही समर्थक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles