नगर शहर विकासाला आ. संग्राम जगताप व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी गती दिली – कुमारसिंह वाकळे
नगर : मागील लोकसभा निवडणुकीमध्ये आ. संग्राम जगताप व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली मात्र शहर विकासासाठी आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून थांबलेल्या विकास कामांना गती दिली त्यामुळेच विकसित शहराकडे वाटचाल सुरू झाली आहे, खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी साखर डाळवाटप कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज एकत्रित करण्याचे काम केले आहे तसेच अयोध्या येथे श्री प्रभू रामचंद्र यांच्या मंदिर लोकार्पण सोहळ्याची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे, धार्मिकतेच्या माध्यमातून समाज एकवटला जात असून आपली परंपरा संस्कृती जोपासण्याचे काम होत असते असे प्रतिपादन मनपा स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी केले.
नागापूर बोल्हेगाव येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वतीने साखर वाटप कार्यक्रम संपन्न झाले, यावेळी मनपा माजी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, दत्ता पाटील सप्रे, आकाश कातोरे, अजिंक्य बोरकर आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगर एमआयडीसी मध्ये औद्योगिक करण्यासाठी पोषक वातावरण – खासदार डॉ. सुजय विखे पाटील
अहमदनगर शहराच्या विकासाला गती प्राप्त झाली असून शहराचे विस्तारीकरण झपाट्याने होत आहे नगर मधील एमआयडीसी मध्ये औद्योगिकीकरणासाठी पोषक वातावरण असल्यामुळे नवीन जागेमध्ये मोठमोठे उद्योग येणार असून युवकांच्या रोजगारीचा प्रश्न देखील मार्गी लागेल, शहरामध्ये पक्ष राजकारण बाजूला ठेवून विकास कामांसाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो असल्यामुळे शहरात चांगले वातावरण निर्माण झाले आहे, साखर वाटप कार्यक्रमांमध्ये सर्वच पक्षांनी पुढाकार घेतला असल्यामुळे एकोप्याचे वातावरण निर्माण झाले आहे, सर्वसामान्य जनता देखील मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहेत, 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे श्री प्रभू रामचंद्र यांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून सर्वांनी या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन आनंददायी वातावरण निर्माण करावे असे ते म्हणाले,