Saturday, May 25, 2024

निलेश लंके समर्थकाकडून विखे पाटील यांच्याविषयी शिवराळ भाषा, कथित ऑडिओ क्लिपमुळे राजकारण तापले…

पारनेर तालुक्यातील एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली असून यामध्ये विखेंच्या विजयाचा अंदाज सांगण्याऱ्याला धमकी आणि शिव्या देण्यात आल्या आहेत. याशिवाय डॉ. विखे यांना उद्देशूनही शिव्या आणि धमक्या देण्यात आल्या आहेत. धमकी देणारा व्यक्ती लंके यांच्या मीडिया सेलचा अध्यक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. याविरोधात विखे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार आहे. तर लंके यांच्याकडून या प्रकाराचा आपल्याशी संबंध नसल्याचे सांगण्यात येत आहे.

पारनेर तालुक्यात रविवारी एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. त्यात दोन व्यक्तींचा संवाद आहे. फोन करणारी व्यक्ती लंके यांच्या मीडिया सेलमधून बोलत असल्याचे आणि लंके यांच्यासमोरच त्यांनी हा फोन केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी हा फोन कळस गावाच्या माजी उपसरपंचाला जाब विचारण्यासाठी लावला आहे. या माजी उपसरपंचाने मीडियाला मुलाखत देताना विखे पाटीलच विजयी होतील, असा दावा केला असून, त्यासंबंधी त्यांना जाब विचारला जात आहे.

. ही क्लीप व्हायरल झाल्यावर पारनेर तालुक्यात दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये चर्चा सुरू झाली.

दुसरीकडे या कथित व्हायरल क्लीपशी संबंध नसल्याचे लंके समर्थकांचे म्हणणे आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles