Sunday, December 8, 2024

एमआयडीसी आणि विकासाच्या मुद्द्यावरून लंकेंची कोंडी? विखेंकडून मोदी सरकारची गॅरंटीवर भर..

एमआयडीसी आणि विकासाच्या मुद्द्यावरून लंकेंची कोंडी? विखेंकडून मोदी सरकारची गॅरंटीवर भर

नगर: नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात विखे विरूद्ध लंके अशी थेट लढत रंगणार आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके जनसंवाद यात्रेतून मतदारसंघ पिंजून काढत आहेत. तर भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनीही महायुतीची मोट बांधून संपर्क सुरू केला आहे. या निवडणुकीत नगर दक्षिणेतील एमआयडीसीचा मुद्दा चर्चेत आला आहे. युवकांना रोजगार मिळण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी उभारणार अशी ग्वाही निलेश लंके देत आहेत. परंतु हाच मुद्दा त्यांच्यासाठी अडचणीचा ठरत आहे.

लंके यांच्या मतदारसंघात असलेल्या सुपा एमआयडीसीतील कथित दहशतीचा मुद्दा भाजपने समोर आणून लंके यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. याऊलट महायुती सरकारच्या माध्यमातून नगर जवळ वडगाव गुप्ता, श्रीगोंदा तालुक्यात बेलवंडी येथे एमआयडीसी मंजूर करण्यात विखेंना यश आले आहे. खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी विरोधकांवर वैयक्तिक टिका टाळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने १० वर्षात केलेली कामे ठळकपणे मांडण्यास सुरुवात केली आहे. उद्योग धद्यांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हजारो रुपायाचा निधी मिळवत गावा गावातील रस्ते, महामार्ग, अशी दळण वळणाची साधने उभी केली. एन.एच.आय तर्फे ४ हजार २७७.५० कोटी रुपयांचा निधी मिळवत जिल्ह्यात सुसज्य, जलद अशा रस्त्यांची निर्मीती केली. १४५४ कोटी रुपयांचा निधी मिळवत सहा राष्ट्रीय महामार्गाचा विकास केला. तर गावागावात वाहतुकीच्या सुविधा पोहचाव्यात यासाठी १३६.१३ कोटी रुपयांचा निधी मिळवत २९ गावांत रस्त्यांचे जाळे उभे केले. दळणवळणाची साधने वाढल्याने उद्योजकांसाठी अहमदनगर हे मुंबई, पुणे, नाशिक आणि इतर जिल्ह्यासाठी मध्यवर्ती ठिकाण झाले. यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे जिल्ह्यात येणार असून स्थानिकांचा रोजगाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे ते सांगतात.

दुसरीकडे विखेंना लंके समर्थकांकडून मिळणाऱ्या धमक्या, सुपा एमआयडीसी अशा मुद्द्यावरून लंकेंची कोंडी होते की काय असे चित्र निर्माण झाले आहे. लंके यांना उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात वेगळे मुद्दे आणि विकासाचे ठोस व्हिजन मांडावे लागेल. याशिवाय महाविकास आघाडीची एकत्रित ताकद उभी करण्याचं आव्हानही पेलावे लागेल.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles