अहमदनगर-लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरू असताना उमेदवाराचा प्रचार करण्याच्या कारणावरुन एकाला मारहाण झाल्याची घटना घडली.
याबाबत अरुण परसराम डांगे (वय ४५, रा. कोऱ्हाळे, ता. राहाता) यांच्या फिर्यादीवरुन युवासेनेचे पदाधिकारी विक्रम राठोड (रा. अहमदनगर) यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल झाला.
फिर्यादी व त्यांचे मित्र मतदान सुरू असताना स्टेट बँक चौकाती छावणी, कॉम्प्लेक्सच्या गाळ्यासमोर थांबलेले होते. त्याठिकाणी विक्रम राठोड आले व उमेदवाराचा प्रचार करण्यावरुन वाद घालण्यास सुरूवात केली.
फिर्यादी राठोड याला म्हणाले की, आम्ही प्रचार करत नाही. त्यानंतर राठोड यांनी फिर्यादी यांना थांबवून शिवीगाळ करत चापटीने मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या खिशात शाईची बाटली टाकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात राठोडसह दोघांवर गुन्हा दाखल झाला.
मतदानाच्या दिवशी एकाला मारहाण, विक्रम राठोड यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल
- Advertisement -