नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने शांततेत गणेश उत्सव साजरा करावा – पोलीस प्रमुख राकेश ओला
नगर – गणेश उत्सवाच्या माध्यमातून एकात्मतेची भावना निर्माण होत असून नागरिकांनी पारंपारिक पद्धतीने व शांततेत उत्सव साजरा करावा. मित्र मंडळांच्या वतीने पारंपरिक, समाज प्रबोधनपर व धार्मिक देखावे साजरे करून आपल्या महान संस्कृतीचे जतन करावे. नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती हे भाविकांचे श्रद्धास्थान असून माझ्या हस्ते मानाच्या गणपतीची स्थापना होते हे भाग्य मला मिळाले. धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज जोडला जातो त्यातून चांगल्या विचाराची देवाण-घेवाण होत असते असे प्रतिपादन जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी केले
श्री गणेश उत्सवानिमित्त माळीवाडा येथे श्री विशाल गणपती मंदिरात मानाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला व प्रिया ओला यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी महंत संगमनाथ महाराज, श्री विशाल गणपती देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त पांडुरंग नन्नवरे, चंद्रकांत फुलारी, विजय कोथिंबिरे, हरिचंद्र गिरमे, ज्ञानेश्वर रासकर, गजानन ससाणे, संजय चाफे, नितीन पुंड आदींसह कर्नल डॉ सोमेश्वर गायकवाड़, माणिकराव विधाते, अशोक कानडे, सुरेश खरपुडे, शहर पोलीस उपाधीक्षक अमोल भारती, कोतवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे अदीसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचा आज वाढदिवस असल्यामुळे श्री विशाल गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी ढोल पथकाच्या वतीने पारंपरिक पद्धतीचे वाद्य करण्यात आले या वेळी मंदिरात फुलांचे आकर्षित सजावट करण्यात आली होती…