Saturday, February 15, 2025

अहमदनगरचे अहिल्यानगर नामांतर ; शहरात हिंदू समाजाने केला जल्लोष

अहमदनगर : नगर जिल्ह्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे केलेले नामकरण हा नगर जिल्ह्याच्या भूमीचा सन्मान आहे, असा विश्वास व्यक्त करत सकल हिंदू समाजाने व्यापक स्वरूपात स्वागत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे फटाके वाजवून उपस्थित नागरिकांना पेठे भरवून स्वागत केले. यावेळी उत्कर्ष फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक भोजने, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वधू वर मेळाव्याचे अध्यक्ष राजेंद्र तागड, माजी नगरसेवक काका शेळके, निशांत दातीर, सचिन चितळकर, इंजि. डी.आर. शेंडगे, अशोक होनमाने, सूर्यकांत तागड, मयूर गायकवाड, भागीनाथ गवते, बाबासाहेब तागड, , आदी मान्यवर उपस्थित होते.

. सकल हिंदू समाजाने व्यापक स्वरूपात या नामांतराचे स्वागत केले आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम जिल्हा राज्याचे मध्यवर्ती केंद्र आहे. राज्यभरातील प्रत्येक सकल हिंदू समाजा द्वारे या नामांतराचे स्वागत होत असल्याने तेथेही सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वासही डॉ अशोक भोजने यांनी व्यक्त केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles