Saturday, December 7, 2024

शाळेजवळून चार विद्यार्थ्यांना अपहरणाच्या थराराने अहमदनगर हादरले

पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथील चार शालेय विद्यार्थ्यांना पडोळे वस्तीवरील मराठी शाळेपासून अज्ञात व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून व चॉकलेट देतो सांगून एका ओमिनी गाडीतून पळवून नेल्याचा प्रयत्न केला.मात्र, एका ग्रामस्थंच्या सतर्कतेमुळे हा संपूर्ण प्रकार फसला. या प्रकारामुळे घाटशिरससह परिसरात विद्यार्थी व पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मढी कडून घाटशिरसमार्गे देवराईकडे चार चाकी वाहनातून जात असलेल्या

अज्ञात व्यक्तींनी पडोळेवस्ती जवळील एका प्राथमिक शाळेजवळ सायकल खेळत असलेल्या तीन चार विद्यार्थ्यांजवळ चार चाकी गाडी उभी करून चॉकलेट देत चाकूचा धाक दाखवत या शालेय मुलांना पळवून नेण्याचा प्रयत्न करत असतानाच जवळच काहीअंतरावर उभे असलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीने या अज्ञात व्यक्तींकडे विचारपूस करत तुम्ही या मुलांना कुठे घेऊन निघाला आहात, अशी विचारणा करत परिसरातील आजूबाजूच्या ग्रामस्थांना आरडाओरड करून घटनास्थळी बोलावले.

लोक पळत येत असल्याचे लक्षात येताच या अज्ञात व्यक्तींनी या मुलांना सोडून चार चाकी वाहनांसह तेथून देवराईकडे पळ काढला. या प्रकारामुळे शालेय विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भितीचे वातारण पसरले आहे.घाटशिरस येथे दोन दिवसांपूर्वी सहावी – सातवीत शिकणारे तीन चार मुले सायकल खेळन असतांना चार चाकी गाडीतून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी या मुलांना चॉकलेटचे आमीष दाखवून त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली.अशा घटनांमळे शालेय मुली व मुलांबाबत पालकांसह शिक्षकांनीदेखील जागृत राहावे, असे आवाहन सरपंच गणेश पालवे यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles