महावितरणकडून मुळा नगर व विळद येथील वीज पुरवठा विद्युत वाहिनीच्या कामांच्या दुरुस्तीसाठी महावितरणकडून दोन दिवसीय शटडाऊन केले जाणार आहे.
शनिवार ७ ऑक्टोबर रोजी, बोल्हेगाव, नागापूर, गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर, सारसनगर, बुरूडगाव रोड, केडगाव, नगर-कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर परिसरात सकाळी ११ नंतरच्या पाणी पुरवठा होऊ शकणार नाही.
रविवार ८ ऑक्टोबर रोजी, बोल्हेगाव सिद्धार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, सावेडी आदी भागात पाणी पुरवठी बंद राहणार आहे.