श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव येथील महिला सरपंच व तिच्या पतीला अन एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला चाळीस हजार रुपयांची लाच प्रकरणी रंगेहात पकडले
*युनिट -* अहमदनगर
▶️ *तक्रारदार-* पुरुष वय- 33,रा जवळा, ता- जामखेड, जि.अहमदनगर
▶️ *आरोपी* – .१) उज्वला सतिष रजपूत, वय 32 वर्ष, सरपंच, कोकणगाव, ता- श्रीगोंदा, जि. अहमदनगर रा- कोकणगाव,ता.श्रीगोंदा,जि,अहमदनगर
२) सतिष बबन रजपूत, वय 42 वर्ष, धंदा – शेती,रा.कोकणगाव,ता.श्रीगोंदा,जि. अहमदनगर
▶️ *लाचेची मागणी-* एकूण बिल 4,61,568 रुपये रकमेच्या 10 टक्के/-₹
46,000/-₹ तडजोडी अंती 40,000/-₹
▶️ *लाचेची मागणी -* ता.10/07/2023
▶️ *लाच स्विकारली -* 40,000/- ₹
▶️ *लाच स्विकारली दिनांक -* 23/11/2023
▶️ *लाचेचे कारण* -.तक्रारदार हे शासकीय कॉन्ट्रॅक्टर असुन, त्यांनी कोकणगाव ग्रामपंचायत अंतर्गत गावातील रस्ता दुरुस्ती,संरक्षण भिंत बांधकाम अशा कामाचा 4,61568/-₹ चा कॉन्ट्रॅक्ट घेतला होता,तक्रारदार यांनी मुदतीत सर्व काम पूर्ण केले,त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांचे कामाचे बिल अकाउंट ला जमा करणे बाबत सरपंच मॅडम व त्यांचे पती यांना विनंती केली असता त्यांनी एकूण बिलाच्या 10 टक्के प्रमाणे 46,000/-₹ ची लाच मागणी केली असल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर येथे दिनांक 10/07/2023 रोजी दिली. सदर तक्रारीचे अनुषंगाने दिनांक 10/07/2023 रोजी कोकणगाव ग्रामपंचायत येथे लाच मागणी पडताळणी केली असता यातील लोकसेवक सरपंच उज्वला सतिष रजपूत व त्यांचे पती सतिष रजपूत यांनी तक्रारदार यांचे कडे 46000/-₹ लाच मागणी करुन सदर लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले,बिल जमा झाल्यानंतर आज रोजी आलोसे क्र 1 यांनी तक्रारदार यांना लाच रक्कम घेऊन बोलविले असता कोकणगाव ग्रामपंचायत येथे आज रोजी सापळा लावण्यात आला,सदर सापळा कारवाई दरम्यान लोकसेवक क्रमांक 1 यांनी आज रोजी ग्राम पंचायत कोकणगाव येथे सदर लाच रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अहमदनगर ब्रेकिंग : महिला सरपंच पतीसह ग्रामपंचायत कर्मचारी ‘एसीबीच्या’ जाळ्यात
- Advertisement -