Sunday, December 8, 2024

केदारनाथ यात्रेत दरड कोसळली…नगरच्या युवकांची जीवाची पर्वा न करता केले मदतकार्य…

नगर तालुक्यातील वाळकी येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक मनोज भालसिंग व त्यांचे सहकारी उत्तराखंड मधील केदारनाथ यात्रेला जात असताना पावसामुळे रुद्रप्रयाग ते सोनप्रयाग मार्गामध्ये दरड कोसळली व यामध्ये अनेक भाविक जखमी झाले. त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले व रस्ता पूर्णपणे बंद पडला व रात्री उशिरा शासकीय मदत भेटत नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक मनोज भालसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथील लोकांना मदतीला घेऊन मध्यरात्री स्वतःच्या जीवाची परवा न करता कोसळलेली दरड मोठे दगड बाजूला सरकून नऊ तासानंतर रस्ता मोकळा केला. त्यानंतर रस्ता मोकळा करून तेथील वाहतूक सुरळीत करून दिली. त्यानंतर शासकीय मदत उपलब्ध होऊन स्थानिक पोलीस प्रशासन व शासकीय अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक मनोज भालसिंग व त्यांचे सहकारी दीपक बोठे, गणेश बोठे, राजेंद्र आव्हाड यांचे आभार मानले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles