शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद अहमदनगर
जिल्हा शिक्षक पुरस्कार 2024
दरवर्षी 5 सप्टेबर शिक्षक दिनाच्या दिवशी उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व केंद्रप्रमुख यांना जिल्हा शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येते. या प्रक्रियेसाठी शिक्षक व केंद्रप्रमुख यांची 100 गुणांची प्रश्नावली अद्ययावत करुन जिल्हा परिषद अहमदनगरच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत आली. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शिक्षक व केंद्रप्रमुखांनी पंचायत समिती कार्यालयामध्ये स्वयंमूल्यमापन करुन प्रश्नावली जमा केली प्रत्येक तालुक्यातून आलेल्या प्रस्तावांची गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी (शिक्षण) यांचेमार्फत पडताळणी होऊन 3 शिक्षक (त्यामध्ये एक शिक्षिका) व एक केंद्रप्रमुख यांचे प्रस्ताव जिल्हा कार्यालयास पाठविणेत आले. जिल्हा स्तरावरुन गटशिक्षणाधिकारी,विस्तार अधिकारी(शिक्षण) व केंद्रप्रमुख तालुके बदलुन यांचेमार्फत पथक परीक्षण करणेत आले त्याचप्रमाणे प्रस्ताव प्राप्त शिक्षक व केंद्रप्रमुख यांची 25 गुणांची लेखी परीक्षा घेणेत आली मा.श्री.आशिष येरेकर प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद अहमदनगर यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समितीची बैठक होऊन पथकाकडून प्राप्त 100 गुणांची प्रश्नावली व लेखी परीक्षेचे 25 गुण असे एकुण 125 गुणांपैकी ज्यांना सर्वात जास्त गुण मिळाले अशा प्रत्येक तालुक्यातून एक शिक्षक यांचा प्रस्ताव मा.विभागीय आयुक्त,नाशिक विभाग नाशिकयांचे मान्यतेस्तव पाठविणेत आला. जिल्हा शिक्षक पुरस्कार 2024 साठी निवड झालेल्या शिक्षक व
केंद्रप्रमुखांची नावे खालीलप्रमाणे.
पुरस्कार प्राप्त शिक्षक
पुष्पा शिवराम लांडे (पदवीधर, शिक्षक, जि. प. प्राथमिक शाळा शिळवंडी, अकोले). संजय एकनाथ कडलग (उपाध्यापक जि. प. प्राथमिक शाळा सावरगाव तळ, संगमनेर). पितांबर मखमल पाटील (पदवीधर जि. प. प्राथ. शाळा दशरथवाडी, कोपरगाव). लिता सुभाषराव पवार (उपाध्यापिका, जि. प. प्राथ. शाळा गमेगोठा (केलवड), राहाता. योगेश भानुदास राणे (उपाध्यापक जि. प. प्राथ. शाळा शिरसगाव, श्रीरामपूर). सुनिल महादेव लोंढे (उपाध्यापक जि. प. प्राथ. शाळा, उंबरे राहुरी), सुनिल तुळसीराम आडसुळ (उपाध्यापक, जि. प. प्राथ. शाळा सोनवणेवस्ती नेवासा). गोरक्षनाथ भिकाजी बर्डे (मुख्याध्यापक, जि. प. प्राथ. शाळा कर्हेटाकळी, शेवगाव). नामदेव तात्याबा धायतडक (पदवीधर जि. प. प्राथ. शाळा सोमठाने नलवडे, पाथर्डी), बाळु गंगाराम जरांडे (उपाध्यापक जि. प. प्राथ. शाळा पवारवस्ती, जामखेड), दिपक प्रभाकर कारंजकर (उपाध्यापक जि. प. प्राथ. शाळा मिरजगाव मुले कर्जत), स्वाती दिलीप काळे (उपाध्यापिका जि. प. प्राथ.शाळा पवारवाडी (अजनुज) श्रीगोंदा. प्रकाश सखाराम नांगरे (उपाध्यापक जि. प. प्राथ. शाळा सोबलेवाडी, पारनेर), वर्षा मोहन कचरे (उपाध्यापिका जि. प. प्राथ. शाळा शिंगवेनाईक अहमदनगर) आणि ज्ञानेश्वर रामकिसन जाधव (केंद्रप्रमुख दहिगांवने शेवगाव) यांचा पुरस्कारर्थीमध्ये समावेश आहे.
(भास्कर पाटील)
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जिल्हा परिषद अहमदनगर