अहमदनगर- केंद्र सरकारचा शालेय विद्यार्थ्यांसाठी असणारा देश पातळीवरील ‘स्व’ हस्तलिखित वीरगाथा उपक्रमांतर्गत भारत देशातून १०० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सहा विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यात अहमदनगर जिल्ह्यातून एकमेव निवड झालेली विद्यार्थिनी कु.गौरी किरण उगले (इयत्ता- तिसरी) ही नगर तालुक्यातील निंबळक जिल्हा परिषद शाळेतील असून तिचा व तिच्या पालकांचा २६ जानेवारी २०२४ रोजी नवी दिल्ली येथे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान होणार आहे.
शालेय स्तरावर उपक्रमशील वर्गशिक्षिका श्रीम.अर्चना जाचक यांचे गौरीला अनमोल मार्गदर्शन लाभले त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला . गौरीच्या मार्गदर्शक शिक्षिका,आई, वडील, निंबळक शाळेतील सर्व शिक्षक या सर्वांचे पं.स.माजी उपसभापती डॉ.दिलीप पवार यांनी अभिनंदन केले. यावेळी निलेश पाडळे, बी.डी.कोतकर, दत्तात्रय दिवटे, शिवाजी दिवटे, अतुल कुलट, सोमनाथ खांदवे, प्रभारी मुख्याध्यापक राजेंद्र निमसे, शिक्षक दत्ता जाधव, सुखदेव पालवे, रघुनाथ झावरे, अलका कांडेकर, सौ.हापसे, सुनिता रणदिवे, शैला सरोदे, प्रयागा मोहोळकर, मुक्ता कोकणे, सुजाता किंबहुने, भागचंद सातपुते, शरद जाधव, विशाल कुलट आदी उपस्थित होते.