Saturday, May 18, 2024

अहमदनगर जिल्हा परिषद बदल्यांची तयारी सुरू, ‘अशी’ असणार प्रक्रिया

जिल्हा परिषद बदल्यांची तयारी सुरू
सेवाज्येष्ठता याद्या तयार करण्याच्या सूचना : निवडणूक निकालानंतर बदल्यांना मुहूर्त
अहमदनगर : शिक्षक वगळता इतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांची तयारी जिल्हा परिषद प्रशासनाने सुरू केली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकांचा निकाल ४ जूनला असल्याने त्यानंतर या बदल्यांना मुहूर्त लागणार आहे.

दरवर्षी मे महिन्यात जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या (शिक्षक वगळता गट क व गट ड) बदल्यांची प्रक्रिया राबवली जाते. दरवर्षी कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध लागलेले असतात. २०२३च्या बदल्या ९ मे पासून सुरू झाल्या होत्या. यंदा मात्र लोकसभेची निवडणूक असल्याने बदल्यांचा कालावधी महिना ते दीड महिना लांबणीवर पडणार आहे. ४ जूनला लोकसभेचा निकाल आहे. त्यानंतरच बदल्या होणार आहेत.
मात्र, तोपर्यंत जिल्हा प्रशासनाने बदल्यांची सर्व तयारी करण्याच्या सूचना खातेप्…
सवलत प्रमाणपत्रासाठी २२ एप्रिलपर्यंत मुदत
दिव्यांग किंवा इतर प्राधान्य संवर्गातील कर्मचाऱ्यांनी संबंधित प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणापत्राची प्रत २२ एप्रिलपर्यंत खातेप्रमुख किंंवा कार्यालयप्रमुखांकडे सादर करायची आहे. दि. २२ नंतर आलेले पुरावे ग्राह्य धरले जाणार नाहीत. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या पुराव्यांची अधिकाऱ्यांनी आपल्यास्तरावरच पडताळणी करावी, तसेच प्रशासकीय व विनंती बदलीतून सूट घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंद त्यांच्या सेवापुस्तकात घेण्यात यावी. पडताळणी केल्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत जोडावे. बदलीबाबत काही तक्रारी उद्भवल्यास संबंधित खातेप्रमुख जबाबदार राहतील, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांनीच करावी प्रमाणपत्र पडताळणी

मागील वर्षी बदल्यांमध्ये काही कर्मचाऱ्यांनी चुकीची प्रमाणपत्रे दिल्याच्या तक्रारी झाल्यानंतर अशी प्रमाणपत्रे पुण्यातील ससून किंवा संबंधित प्राधिकाऱ्याकडून पडताळणी करून आणण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. यावर्षीही बदल्यांमध्ये सूट घेताना बनावटगिरी होऊ नये यासाठी खातेप्रमुखांनी आपल्या स्तरावर आधिच प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अशी असेल बदल्यांची तयारी
सेवाज्येष्ठता यादी तयार करणे : १५ एप्रिल २०२४

बदलीसाठी विकल्प, विनंती अर्ज सादर करणे : २२ एप्रिल २०२४
विकल्प, विनंती अर्ज छाननी : ३० एप्रिल २०२४

तात्पुरती प्रारूप ज्येष्ठता यादी जि. प. संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे : ७ मे २०२४ अखेर
ज्येष्ठता यादीवर हरकती, आक्षेप घेणे : १३ मे २०२४

हरकतींचे निराकरण करून अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे : १५ मे २०२४

रिक्त पदांचा तपशीलही कळवा
बदली प्रक्रियेची माहिती अद्ययावत करण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी सर्व संवर्गांच्या रिक्त पदांचा तपशील स्वतंत्र्यरित्या (संवर्गनिहाय) संबंधित विभागाकडे ३१ मे २०२४ पर्यंत सादर करावा, असेही सूचित करण्यात आले आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles