Saturday, May 25, 2024

Ahmednagar…30 लाखांचा ढंपर चोरला, ‘एलसीबी’ने शिताफीने अटक केला आरोपी

30,00,000/- रुपये किमतीचा ढंपर चोरी करणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांची कारवाई

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी श्री राजेंद्र लक्ष्मण मुसमाडे वय 57 वर्षे, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहमदनगर यांचे मालकीचा 30,00,000/- रुपये किमतीचा अशोक लेलंड कंपनीचा हायवा ढंपर क्रमांक एम.एच.17 ए. जी. 9222 हा दिनांक 05/04/2024 रोजी राहुरी फॅक्टरी येथील मुसमाडे यांचे पेट्रोलपंपावर लावलेला असतानां कोणीतरी अज्ञात चोरट्याने सदर ढंपर चोरुन नेला आहे. सदर घटनेबाबत राहुरी पोलीस ठाणे गु.र.नं. 401/2024 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी सदर गुन्हा उघडकीस आणुन चोरीस गेला मुद्देमाल हस्तगत करणेबाबत पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.
नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, रविंद्र कर्डीले, गणेश भिंगारदे, संतोष लोढे, पोना/संदीप चव्हाण, रोहित मिसाळ, प्रमोद जाधव, आकाश काळे, अमृत आढाव, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे यांचे पथक तयार करुन पथकास गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.
वरील पथकाने दिनांक 12/04/2024 रोजी गुन्हा घडले ठिकाणी जावुन गुन्हा ठिकाणचे सी.सी.टी.व्ही. फुटेज पडताळणी केली तसेच सदर हायवा ढंपरचे जी.पी.एस. वरुन माहिती घेता सदर ढंपरचे जी.पी.एस. हे खडका फाटा नेवासा येथे बंद झाल्याचे दिसुन आले. त्यानुसार पथकाने रोडचे फुटेजची पाहणी केली असता फुटेजमध्ये सदरचा ढंपर हा राहुरी, घोडेगांव, नेवासा फाटा, वाळुंज पंढरपुर, वैजापुर मार्गे शिर्डी परिसरामध्ये दिसुन आला. पथकाने शिर्डी परिसरामध्ये फुटेजमध्ये संशयीरित्या दिसुन येत असलेल्या इसमाची ओळख पटवुन त्याचे नांव प्रकाश एकनाथ कदम रा. साकुरी, ता. राहाता, जि. अहमदनगर असे असल्याचे निष्पन्न केले. प्रकाश कदम याचा गुप्त बातमीदारामार्फत शोध घेता तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्ह्यातील चोरीस गेले ढंपरबाबत सखोल विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार समीरखान नसिरखान पठाण, रा. खंडाळा, ता. वैजापुर, जि. छ. संभाजीनगर व त्याचे इतर दोन अनोळखी साथीदार अशांनी केला असल्याचे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या ढंपरबाबत विचारपुस करता त्याने सदरचा ढंपर हा नाला नंबर 32 वरील जाधव वस्ती जवळ, रुई शिवार, ता. राहाता, जि. अहमदनगर या ठिकाणी असलेल्या काटवनात लावलेला असल्याचे सांगितले. सदर ठिकाणी जावुन खात्री करता काटवनामध्ये गुन्ह्यातील ढंपर मिळुन आला आहे. तसेच समीरखान पठाण व त्याचे इतर दोन अनोळखी साथीदारांचा शोध घेता ते मिळुन आले नाही.
ताब्यात घेण्यात आलेला इसम नामे प्रकाश एकनाथ कदम रा. साकुरी, ता. राहाता, जि. अहमदनगर याचे ताब्यातुन गुन्ह्यातील चोरी गेलेला 30,00,000/- रुपये किमतीचा अशोक लेलंड कंपनीचा हायवा ढंपर क्रमांक एम. एच. 17 ए. जी. 9222 मिळुन आल्याने तो ताब्यात घेवुन पुढील तपासकामी राहुरी पोलीस स्टेशनला हजर करण्यात आला असुन पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करीत आहे.

सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री बसवराज शिवपुजे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर विभाग श्रीरामपुर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles