Saturday, March 2, 2024

कोतवाली, तोफखाना पोलिस स्टेशनला नवीन प्रभारी…बदलून आलेल्या पोलिस निरीक्षकांना नियुक्त्या…

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या आदेशाने जिल्ह्यातील ९ पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर तर १० निरीक्षकांच्या बाहेरहून नगर जिल्ह्यात बदल्या करण्यात आल्यानंतर आता जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकारी यांच्या नियुक्तीत बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आज, मंगळवारी काढले आहेत.

पोलीस अधिकारी व त्यांच्या नवीन नेमणुकीचे ठिकाण पुढीलप्रमाणे- पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड (आर्थिक गुन्हे शाखा), ज्योती गडकरी (नियंत्रण कक्ष), विजय करे (जिल्हा विशेष शाखा), प्रताप दराडे (कोतवाली), अरूण आव्हाड (सुपा), संजय ठेंगे (राहुरी), संजय सोनवणे (आश्वी), अशोक भवड (शनिशिंगणापूर), संतोष भंडारे (बेलवंडी), गुलाबराव पाटील (अकोले), नितीनकुमार चव्हाण (पोलीस अधीक्षकांचे वाचक), आनंद कोकरे (तोफखाना), नितीन देशमुख (श्रीरामपूर शहर), सतीष घोटेकर (मानवसंसाधन), समीर बारावकर (पारनेर), संदीप कोळी (कोपरगाव तालुका), रामकृष्ण कुंभार (शिर्डी).

सहायक पोलीस निरीक्षकांच्या नवीन नियुक्ती- योगेश राजगुरू (भिंगार कॅम्प), माणिक चौधरी (एमआयडीसी), आशिष शेळके (सोनई), कैलास वाघ (लोणी), युवराज आठरे (सायबर), दीपक सरोदे (राजुर), रामचंद्र कर्पे (भरोसा सेल).

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles