अहमदनगर शहर शिवसेना प्रमुख दिलीप सातपुते यांना नगर शहर प्रमुख पदावरून हटविण्यात आले असून नगर शहराच्या शहर प्रमुखपदी सचिन जाधव यांची शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी नियुक्ती केल्याची माहिती मिळत आहे. याबाबतचा आदेश 28 जून रोजी काढण्यात आला आहे.
पत्रात म्हटले आहे की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते माननिय एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या शहर प्रमुख पदी (कार्यक्षेत्र अहिल्यानगर शहर) नियुक्ती करण्यात येत आहे. सदर नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असेल. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. असे म्हंटले आहे.