१ डिसेंबर जागतिक एड्स दिन निमित्ताने एड्स नियंत्रण विभागाकडून विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
१ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून सर्वत्र पाळण्यात येतो, या दिवसाच्या निमित्ताने समाजात वेगवेगळ्या गटांमध्ये एच आय व्ही/ एड्स बद्दल जनजागृती व्हावी , एच आय व्हि संसर्गित रुग्णांना समाजात कलंक भेदभाव होऊ नये व संसर्गित रुग्णांना समाजात सर्वसामान्यांसारखी वागणूक मिळावी व सदर रुग्ण न घाबरता उपचार घेण्यास पुढे यावे, तसेच नवीन संसर्ग वाढवू नये यासाठी युवकांमध्ये, सर्व सामान्य जनता, अति जोखीम गटातील व्यक्ती, दुर्लक्षित गट यांच्या मध्ये एच आय वी / एड्स बाबत जनजागृती करण्यासाठी डॉ. एन एस चव्हाण जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय अहील्यानगर यांच्या मार्गदर्शन खाली १ डिसेंबर ते ७ डिसेंबर त्याचप्रमाणे त्यापुढील कालावधीतही जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जनजागृती प्रभात फेरी, महाविद्यालयात व्याख्यान, विविध शासकीय कार्यालयात तील कर्मचाऱ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम, रेल्वे, बस स्थानक या ठिकाणी तपासणी शिबिराचे आयोजन अति जोखमीचे गट यांच्याकरिता समुपदेशन व तपासणी शिबिरे, प्रश्नमंजुषा स्पर्धा , पोस्टर्स स्पर्धा, सोशल मीडिया पोस्ट स्पर्धा, वधू वर मेळावा, पथनाट्य, फ्लॅश मॉब ऍक्टिव्हिटी , मानवी साखळी द्वारे संदेश देणे, समाजातील दुर्लक्षित गट जसे बांधकाम कामगार, घरेलू कामगार, विविध वाहनांचे चालक क्लिनर यांचे करिता एच आय व्ही एड्स जनजागृती, समुपदेशन, तपासणी, संदर्भ सेवा इत्यादी करिता वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे..
सदर उपक्रम हे जिल्ह्यातील एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र, प्रकल्प राबविनाऱ्या स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयात कार्यरत रेड रिबीन क्लब तसेच शासकीय विभागाच्या मदतीने व्यापक प्रमाणात राबविण्यात येणार आहेत.
तरी सदर उपक्रमात जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी, शासकीय कार्यालयातील कर्मचारी, विविध संस्था अंतर्गत लाभार्थी व सर्वसामान्य जनता यांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. एन एस चव्हाण जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर