Wednesday, April 30, 2025

Airtel ८४ दिवस व्हॅलिडिटी असलेला स्वस्त प्लॅन, अनलिमिटिड कॉलिंगसह…

Airtel एअरटेलकडे अनलिमिटिड कॉलिंग प्लॅन अंतगर्त मोठी वैधता असलेला एक दमदार प्लॅन आहे. ह्या प्लॅनमध्ये युजरला डेटा, कॉलिंग आणि फ्री बेनिफिट्स मिळतात जो कंपनीनं खूप परवडणाऱ्या किंमतीत कंपनीनं सादर केला आहे. हा ८४ दिवसांची वैधता असलेला एक स्वस्त प्लॅन आहे. हा प्रीपेड प्लॅन ४५५ रुपयांमध्ये Airtel Thanks App किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून अ‍ॅक्टिव्हेट करता येईल. प्लॅन तुम्हाला अनलिमिटेड लोकल, एसटीडी कॉलिंग व्यतिरिक्त रोमिंग कॉल्सची सुविधा देतो. ह्या प्लॅनमध्ये युजरला ६जीबी हाय-स्पीड इंटरनेट डेटा दिला जातो जो प्लॅनची वैधता असे पर्यंत वापरता येतो. हा डेटा तुम्ही एकाच वेळी संपवू शकता किंवा ८४ दिवस तुमच्या सोयीनुसार वापरू शकता. ह्या एअरटेल प्लॅनसह तुम्हाला ९०० SMS मोफत दिले जात आहेत. प्लॅनमध्ये काही एक्सट्रा बेनिफिट्सचा देखील समावेश आहे. तसेच तुम्हाला Free Hello Tunes चं सब्सक्रिप्शन देखील मिळेल ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीचं गाणं हॅलो ट्यून म्हणून सेट करता येईल.

Video ‘मला लागली कुणाची उचकी..’ कोरियन तरूणींची नऊवारी साडी नेसून भन्नाट लावणी

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles