अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यात दुरावा आला असून लवकरच ते घटस्फोट घेणार असल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. अनेक कार्यक्रमांमध्ये ऐश्वर्या फक्त लेक आराध्या बच्चनसोबतच दिसून आली आहे. ऐश्वर्याने आता अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला सोडला असल्याचं समोर आलं आहे. ऐश्वर्या राय सध्या आराध्यासोबत तिच्या माहेरी आई वृंदा रायसोबत राहत आहे.
ऐश्वर्या अन् अभिषेक बच्चन विभक्त होणार नाहीत
‘जूम’च्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय बच्चनने ‘जलसा’ हे बच्चन हाऊस सोडलं असून ती वेगळी राहत आहे. ऐश्वर्या वृंदा राय यांच्या घरी राहत असली तरी अभिषेक बच्चनसोबतही ती तेवढाच वेळ घालवत आहे. बच्चन हाऊस सोडलं असलं तरी अभिषेक मात्र तिच्यासोबत आहे. ऐश्वर्या आणि जया बच्चन बोलत नसल्याचं म्हटलं जात आहे. श्वेता बच्चन जलसामध्ये राहायला आल्याचं ऐश्वर्याला पटलेलं नाही. अभिषेक मात्र पत्नी ऐश्वर्याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक विभक्त होणार नाहीत हे चित्र स्पष्ट आहे.