हल्लीच्या काळात विविध फ्लेव्हर्सच्या पाणी पुरी आल्या आहेत. ही मंडळी चॉकलेट पाणी पुरी, डोसा पाणी पुरी, मॅगी पाणी पुरी, आईस्क्रिम पाणी पुरी अशा अजब पदार्थांचे शोध लावतात. आता एक नवा पदार्थ समोर आलाय. या पदार्थाला एग पाणी पुरी म्हणतात. म्हणजे यामध्ये भाजी ऐवजी चक्क अंडी वापरली जातात. सर्वात आधी उकडलेली अंडी उकडून घेतली. मग त्यामध्ये टोमॅटो सॉस आणि फ्रेश क्रिम टाकली. अन् अशी तयार झाली एग पाणी पुरी. या अनोख्या पाणी पुरीचा व्हिडीओ surti_lalo या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या पदार्थामध्ये ना पाणी आहे न पुरी आहे. पण तरी देखील हा पदार्थ पाणी पुरीच्या नावाखाली विकला जात आहे.
- Advertisement -