मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर आरोप करणारे अजय बारस्कर महाराज यांच्याविरुद्ध सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बारस्कर यांच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलने होतायेत. बारस्कर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतच वास्तव्याला आहेत. विविध वृत्तवाहिन्यांना मुलाखती देतायेत. आज रात्री साडे आठच्या सुमारास चर्चगेट परिसरातून बारस्कर प्रवास करत असताना काही लोकांनी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला, अशी माहिती स्वत: बारस्कर यांनी दिली.हल्ल्यानंतर जवळच असलेल्या पोलिसांनी हल्लेखोरांना अडवलं आणि ताब्यातही घेतलं