नेहमीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांसाठी रेशीमबागेतील कार्यालयात बौद्धिकाचं आयोजन केलं होतं. या बौद्धिकाला भाजपचे मंत्री आणि आमदार उपस्थित होते. शिंदे गटाचे मंत्री आणि आमदारही उपस्थित होते. मात्र, अजितदादा गटाच्या एकाही मंत्र्याने किंवा आमदाराने या बौद्धिकाला हजेरी लावली नाही. विचारधारेच्या मुद्द्यावरून अजितदादा गटाने संघाच्या बौद्धिकाला पाठ फिरवली असल्याचं सांगितलं जात आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपचे आमदार आणि मंत्र्यांसाठी बौद्धिक वर्गाचं आयोजन केलं होतं. या बौद्धिक वर्गाला भाजपचे आमदार आणि मंत्री उपस्थित होते. शिंदे गटाचे आमदार आणि मंत्रीही पहिल्यांदाच या शिबिराला हजर राहिले. मात्र, अजितदादा गटाच्या आमदार आणि मंत्र्यांनी या बैठकीला पाठ फिरवली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अजितदादा गटाच्या या भूमिकेवर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
संघाने रेशीमबागेत दरवर्षी प्रमाणे भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांसाठी बौद्धिकाचं आयोजन केलं होतं. या बौद्धिकाला भाजप आणि शिंदे गटाचे आमदार तसेच मंत्रीही हजर होते. शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री पहिल्यांदाच या बौद्धिकाला हजर होते. पण निमंत्रण असूनही अजितदादा गटाचा एकही आमदार संघाच्या बौद्धिकाला उपस्थित राहिला नाही. त्यामुळे विचारधारेच्याबाबत अजितदादा गट भाजपपासून अंतर राखूनच असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. तर, संघानं कुणालाही निमंत्रण पाठवलं नाही. भाजपचे आमदार इथे दरवर्षी येतात, असं संघाने स्पष्ट केलं आहे. यावेळी संघाचे विदर्भ सरसंघचालक श्रीधर घाडगे यांच्याकडून आमदारांना मार्गदर्शन करण्यात आलं.