Saturday, April 26, 2025

अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादी पडेल ते काम करेल, खंद्या समर्थकाने कंबर कसली!

अजित पवार या गटासह महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी झाले. सहा महिन्यांपासून अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. तर त्यांच्या गटातील आठ आमदार मंत्री झाले आहेत. अजित पवार महायुतीत गेल्यापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा सातत्याने वेगवेगळ्या पक्षातील किंवा त्यांच्याच नेत्यांकडून केला जात आहे. अजित पवारांनी विरोधी पक्षांमधील नेते असो अथवा अजित पवारांचे समर्थक, अनेकांनी अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील असा दावा केला आहे.एवढच नाही तर त्यांचे बॅनर देखील लागले होते. आता चर्चांना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींच्या वक्तव्यामुळे पुन्हा उधाण आले आहे.

दरम्यान, अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि आमदार अमोल मिटकरी यांनी यावर भाष्य केलं आहे.अमोल मिटकरी यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मिटकरी म्हणाले, 2024 चा संकल्प एवढाच की, राज्याचे मुख्यमंत्री हे अजित पवार व्हावे आणि त्यासाठी राष्ट्रवादी पडेल ते काम करेल.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles