कर्जत जामखेडच्या एमआयडीसीच्या मुद्यावरुन आमदार राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात जुंपली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता, ‘मग मी काय करु’ असे उत्तर अजित पवार यांनी दिली. राम शिंदे साहेब सांगतील त्या पद्धतीने तो मुद्दा सुटेल असे अजित पवार म्हणाले.
कर्जत जामखेडच्या एमआयडीचा मुद्दा नियमाच्या चौकटीत बसवून सोडवावा लागेल. तिथं तरुण तरुणींना रोजगार कसा मिळेल याचा विचार केला पाहिजे. त्या ठिकाणी जास्त गुंतवणूक कशी होईल, असा महायुतीचा प्रयत्न चालला असल्याचे अजित पवार म्हणाले. याबाबत तेथील आमदार राम शिंदे हे अतिशय बारकाईनं प्रयत्नशील असल्याचे अजित पवार म्हणाले. ज्या ठिकाणी कर्जत जामखेडची एमआयडीसी प्रस्तावीत होती, तिथं नीरव मोदींची जमीन आहे, याबाबत अजित पवारांना विचारले. यावेळी अजित पवार म्हणाले की, नीरव मोदीची भारतात येण्याची शक्यता फार कमी आहे. ते इथे आले तर त्यांच्यावर कारवाई होईल. आपण नियमांच्या चौकटीत बसून च्या संदर्भात काम करु असे अजित पवार म्हणाले.
कर्जत जामखेडच्या एमआयडीसी आ. राम शिंदे आ.रोहीत पवार यांच्यात जुंपली अजित पवार स्पष्टचं म्हणाले….
- Advertisement -